महिला लोकशाही दिन २० जानेवारी रोजी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.*
लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment