उरण येथे महिलांची आरोग्य तपासणी व औषधे वाटप 

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण मेडिकल वेल्फेयर असोसिएशन व आयुर्वेद व्यासपीठ उरण शाखेतर्फे आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाउरनगर उरण येथील आंगणवाडीमध्ये महीलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला.याचा लाभ ९० हून अधिक महिलांनी घेतला.

यासाठी डाॅ हेमलता वैशंपायन,डाॅ दया परदेशी,डाॅ प्राजक्ता कोळी,डाॅ सविता ढेरे यांनी रूग्ण तपासणी करुन औषधे दिली.या उपक्रमाचे उत्तम असे व्यवस्थापन श्लोक पाटील ( माई फांउडेशन, कलश फांउडेशन) व  कल्पना सुर्वे ( स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन) यांनी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment