महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता विषयक सुविधांना प्राधान्य : ना. अदिती तटकरे

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यांनी एक्सवर म्हटले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment