मांडकी कृषी महाविद्यालयात विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रम

Team RatnagiriLive
1 Min Read
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त उपक्रम

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 29 मार्च 2025 रोजी करण्यात आले.


कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह व्याख्याते माधव गांगुर्डे, शिवशाहीर प्रवीण जाधव आणि समन्वयक नंदकिशोर जुवेकर उपस्थित होते.


नटराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व्याख्याते श्री. माधव गांगुर्डे (पनवेल) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट आणि त्यांचे कार्य आपल्या व्याख्यानातून मांडले. त्यानंतर संभाजीनगर येथील शिवशाहीर प्रवीण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment