प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ : प्रस्तावांसाठी आवाहन

Team RatnagiriLive
1 Min Read
  • पात्र बालकांनी https://awards.gov.in संकेतस्थळामार्फत प्रस्ताव करावेत

रत्नागिरी : शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र बालकांनी https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत आपले प्रस्ताव करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत रुक्मिणी ज्ञानोबा हावळे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02352-220461 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा जास्त आणि 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे. ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौय अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा बालकांनी आपले प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने https://awards.gov.in या संकेतस्थळावर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment