मानवी वस्तीत आलेल्या अजगराला जीवदान!

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रात्रीच्या वेळी पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने दारूच्या नशेत अजगराला पकडून त्याचा खेळ करत असताना तो आढळला. यावेळी तेथे उपस्थित असलेले प्रथमेश पाटील यांनी सावधगिरी बाळगत केअर ऑफ नेचर संस्थेचे सर्पमित्र पनवेल विभागप्रमुख साजन सुनील वास्कर, कुंडेवहाळ शाखा प्रमुख स्वामी वास्कर यांना कॉल करून बोलावण्यात आले. त्यांनी तो अजगर जातीचा साप पकडून वन विभागाचे अधिकारी सय्यद मुबारक यांच्या स्वाधीन करून त्यांच्या उपस्थितीत अजगराला जंगलामध्ये सोडून त्याला जीवदान दिले.

साजन वास्कर, स्वामी वास्कर हे सर्पमित्र असून त्यांनी आजपर्यंत अनेक मुक्या जीवांना जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत घुसलेल्या अजगराला जीवनदान दिल्याने साजन वास्कर व स्वामी वास्कर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment