बुडणाऱ्या नौकेतील १६ पर्यटकांना वाचवणाऱ्या फरीद तांडेल यांचा सन्मान

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी :  शहरानजीक असलेल्या रनपार समुद्रात नौकेमधून फिरण्यासाठी गेलेल्या १६ तरुणांना वाचविणारा फरीद तांडेल यांचा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी,सुहेल मुकादम मित्र परिवार, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना ,जलतरण संघ,टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच शहरातील वकील, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना फरीद तांडेल म्हणाले की, ज्या वेळी समुद्रात बोट बुडत होती त्यावेळी मी तेथे होतो मी क्षणाचाही विचार न करता माझी बोट घेवून त्या बुडणा-या 16 तरुणांना वाचविले त्या नंतर कोस्टल गार्ड व पोलीस आले आणि या सर्वांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

सध्याच्या समाजातील दूषित होत असलेल्या वातावरणाला फरीदने प्रसंगावधान दाखवत आपल्या कृतीतून चोख उत्तर दिले असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment