बारावी परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल

Team RatnagiriLive
1 Min Read

पुणे : राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल उद्या (सोमवारी) ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

या बाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) 5 मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment