भारताच्या एअर स्ट्राईकनंतर खेडमध्ये जल्लोष; फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव

Team RatnagiriLive
1 Min Read

खेड : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली असून खेड शहरातही या विजयाचा जल्लोष करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईने देशवासीयांच्या मनात असलेला रोष व्यक्त करत पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय महिलांच्या सिंदूरावर झालेल्या आघाताचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया मिळत आहे.

या ऐतिहासिक कारवाईच्या समर्थनार्थ खेड येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, स्वप्नील सैतावडेकर, आकाश पिंपळकर, पियुष माने, प्रशांत बारटक्के, अतुल शेठ, राकेश मोरे, भूषण कारेकर, अक्षय जांभुळकर, संजय आखाडे यांच्यासह समस्त खेडवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने “देशासाठी दिलेले हे प्रत्युत्तर आमचं अभिमान वाढवणारं आहे. या क्षणी संपूर्ण खेड एकजुटीने देशाच्या पाठीशी उभी आहे.”

श्री. वैभव खेडेकर, मनसे नेते, खेड

या घटनांमुळे देशाच्या सुरक्षाबलांवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. खेडमध्ये झालेला हा उत्सव राष्ट्रभक्तीचा प्रतीक ठरला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment