संभाजीराव भिडे गुरुजींचे विचार हिंदुराष्ट्रासाठी प्रेरणादायी : ना. नितेश राणे

Team RatnagiriLive
1 Min Read

बांदा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे श्री. भिडे गुरुजींचे हिंदुत्ववादी विचार कायमच हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादायी असतात. गुरुजींच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक हिंदूने प्रामाणिकपणे केल्यास हिरवे साप वळवळणार नाहीत. प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे त्यातच आपले हित आहे,  असे राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बांदा येथे केले.

बांदा येथे श्री राम चौकाचे अनावरण करताना भिडे गुरुजी, पालकमंत्री नितेश राणे व अन्य

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा बांदातर्फे मुंबई – गोवा महामार्गावर कट्टा कॉर्नर येथे श्रीराम चौकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे अधिकृत उद्घाटन संभाजीराव भिडे गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. नितेश राणे बोलत होते.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर , बांदा उपसरपंच आबा धारगळकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, संदेश पावसकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, साई काणेकर, गुरु सावंत, मधुकर देसाई, प्रविण देसाई, सिद्धेश महाजन, गुरु कल्याणकर, निलेश सावंत, निलेश कदम, मंदार केसरकर, मंगेश पाटील आदिसह शेकडो हिंदू प्रेमी उपस्थित होते. यावेळी हिंदू राष्ट्र की जय आणि जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment