कडवई येथील वरदान देवी देवस्थानच्या भक्त निवासाचे लोकार्पण

Team RatnagiriLive
1 Min Read

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील वरदानदेवी देवस्थानकडून नव्याने बांधण्यात आलेल्या “भक्त निवास” चा लोकार्पण  रत्नागिरी संगमेश्वरचे  आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कडवई येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला निवास, स्वच्छता आणि सुरक्षिततेची सुविधा मिळावी, याच अपेक्षेने हे भक्तनिवास बांधण्यात आले आहे.

आजच्या या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून, आपण सर्वांनी एक नवा संकल्प करूया की, ही जागा केवळ भक्तनिवास म्हणून न राहता, सेवेचे, स्वच्छतेचे आणि आत्मियतेचे केंद्र बनावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि देवीच्या कृपेने हे स्थान अधिकाधिक सेवाभावी आणि भक्तिपूर्ण बनो, देवीच्या कृपेने हे भक्त निवास भवन अनेक वर्षे भाविकांच्या सेवेसाठी उपयोगी ठरो आणि अधिकाधिक भक्तगण येथे येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होतील, अशीच माझी प्रार्थना आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

या भक्त निवासामुळे बाहेरुन येणाऱ्या भक्तांना निवासाची सोय होणार आहे, त्यांची यात्रा अधिक सुलभ आणि आनंददायी होणार आहे. देवस्थानात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुटसुटीत निवासाची गरज होती. आज ती गरज या भक्त निवासाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.

ना. उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी.

या लोकार्पण सोहळ्याला गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment