रत्नागिरीत धुवाधार पावसाचे थैमान!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मंगळवारी दुपारच्या सुमारास हलक्या सरींच्या स्वरूपात सुरुवात केलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळी सात वाजता सुमारास धुवाधार स्वरूपात कोसळत अक्षरशः झोडपून काढले. हंगाम पूर्व पावसाने 20 तारखेला इतक्या मोठ्या स्वरूपात कोसळून दणका दिला आहे.

मागील काही दिवसांपासून अधूनमधून कोसळत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी सायंकाळपासून चांगला जोर पकडला आहे. त्याआधी मंगळवारी दुपारपर्यंत लख्ख ऊन पडलेले पाहायला मिळाले. मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हलक्या सरीच्या स्वरूपात कोसळलेल्या पावसाने सायंकाळी मात्र जून- जुलैमधील पावसाचे दर्शन घडवले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment