रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’

Team RatnagiriLive
3 Min Read
  • 24 व 25 मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
  • नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. 22 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 22 मे 23 मे 2025 या कालावधीत रेड अलर्ट व 24 व 25 मे या कालावधीत ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. 22 व 23 मे 2025 या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी 50 ते 60 किमी प्रती तास) मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 24 मे व 25 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल
22 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात श्रीमती मनसुर अहमद पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून लागलेल्या आगीत नगरपंचायत घर क्र. 287/2 चे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून लाईट फिटींगचे नुकसान झाले आहे. शिरगाव येथे शिवराज विजय शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळीसरे येथे जगन्नाथ महादेव शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे दयानंद लिलाधर जाधव यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे प्रकाश तुकाराम जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. वीज चमकत असताना विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233. व्हॉटसअप क्रमांक 7057222233, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112. जिल्हा रुग्णालय 02352-222363. महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018. तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127, तहसिल कार्यालय लांजा 02351-230024, तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027, तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044, तहसिल कार्यालय खेड 02356- 263031, तहसिल कार्यालय दापोली 02358-282036, तहसिल कार्यालय गुहागर 02359- 240237, तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment