उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा उद्या दुपारी ऑनलाईन निकाल

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी  : फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील १७००० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. हा निकाल गुरुवारी २  वाजता जाहीर होणार आहे. बोर्डाकडून या परीक्षेला २६ हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी १७ हजार विद्यार्थी जिल्ह्यातील आहेत.


फेब्रवारी-मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालियीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकड़े विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

ज्या विद्याध्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment