आरवली बस थांब्यावरील उघडे गटार प्रवाशांसाठी धोकादायक

Team RatnagiriLive
1 Min Read

आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली बाजारपेठेत उडण पुलाखालील सर्व्हिस रोडच्या थांब्यावर ठेकेदाराने उघडे ठेवलेले रस्त्यालगतचे गटार प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली बाजारपेठेतून जाणाऱ्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडच्या काँक्रिटीकरण्याचे काम अलीकडेच पूर्ण करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखाली असलेल्या या थांब्यावर ठेकेदाराने गटाराचे काम करताना झाकणे बसवून गटार बंद केलेले नाही. उघडे ठेवण्यात आलेले हे गटार प्रवाशांसाठी धोकादायक ठरले आहे. पाऊसही सुरू झाल्याने हा धोका आणखी वाढला आहे.
एसटी बस भर थांब्यावर असलेल्या या उघड्या गटारावर तातडीने झाकणे बसवावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ दिनेश परकर यांनी केली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment