धुवाधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची राजापूर शहरास भेट देऊन पाहणी

Team RatnagiriLive
1 Min Read

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोसळणऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिह यांनी सोमवारी सायंकाळी राजापूर शहरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱयीं बैठक घेत नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधारेने कोसळणाऱया पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पावसामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी सोमवारी राजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांयाची बैठक घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment