चिपळूणची दामिनी देवळेकर पुणे विद्यापीठाच्या एल.एल.एम. परीक्षेत प्रथम

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ (कायदा विभाग) द्वारे घेण्यात आलेल्या एल.एल.एम. (LL.M.) पदव्युत्तर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, चिपळूणची कु. दामिनी प्रीतम प्रशांत देवळेकर हिने संपूर्ण विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावून चिपळूणचे नाव उज्वल केले आहे.
कु. दामिनी हिचे शालेय शिक्षण चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण येथे घेतल्यानंतर तिने वकिलीची (LL.B.) पदवी पुण्यातील एस.सी.एल.सी. कॉलेजमधून पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉमधून बिझनेस लॉ या विशेष विषयात एल.एल.एम. शिक्षण घेतले.
या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण कायदा विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या दामिनीचे चिपळूणसह पुणे आणि तिच्या शिक्षण संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे चिपळूणचा शैक्षणिक नकाशावर गौरवाने उल्लेख होत आहे.
दामिनी हिच्या यशामागे तिची चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि पालकांचे पाठबळ हे महत्त्वाचे घटक आहेत. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, ती भविष्यात कायदा क्षेत्रात भरीव योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment