जसखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमलता ठाकूर यांची निवड

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात प्रसिद्ध व श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत जसखार उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्यामुळे सोमवार दि.०९ जून २०२५ रोजी झालेल्या मिटिंगमध्ये शिवसेना भाजप युतीच्या हेमालता ठाकूर या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या विजयामध्ये उरण विधानसभेचे आमदार महेशशेठ बालदी यांचे तसेच शिवसेना (शिंदे गट) रायगड जिल्हाप्रमुख अतुलशेठ भगत यांचे विशेष सहकार्य लाभले.

युवा सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा जसखार यांच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.या निवडणुकीचे किंगमेकर राकेश तांडेल व सचिन घरत ठरले आहेत.

जसखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड झाल्याने दिपक ठाकूर तालुकाप्रमुख उरण, सुरेश म्हात्रे कामगार नेते, निशांत ठाकूर मनसे अध्यक्ष, नितीन पाटील माजी सरपंच, अमित ठाकूर उपतालुकाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्या सीमा ठाकूर, वैजयंती ठाकूर, धनवंती ठाकूर, दमयंती म्हात्रे, युवा सामाजिक संस्था अध्यक्ष हर्षल ठाकूर, खजिनदार मयूर तांडेल, रितेश म्हात्रे, भालचंद्र ठाकूर, जनार्दन म्हात्रे, सतीश वाजेकर,मेघनाथ ठाकूर शाखाप्रमुख, रवी ठाकूर, योगेश म्हात्रे, बिट्टू आणि ग्रामस्थांनी उपसरपंच हेमलता ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment