भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजूर

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ठराव करुन रायगड चे पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्याकडे दिला होता.

बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करुन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून या कामासाठी निधी मंजुर करुन घेतला आहे. लवकरच हा निधी भेंडखळ ग्रामपंचायतीकडे सुपुर्द होईल, या बाबत भेंडखळ गावच्या ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास आघाडीने अतुल भगत यांचे आभार मानले आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment