जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले मुलांचे स्वागत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दिनांक 16 जून 2025 पासून झाली असून शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या “100 शाळांना भेटी देणे ” या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाचणे नंबर 1 या शाळेला भेट देऊन इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेतील सुविधांबाबत आढावा घेतला.

यावेळी नाचणे ग्रामपंचायतचे सरपंच श्री. ऋषिकेश भोंगले, विभागीय वन अधिकारी श्री रणजीत गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संदेश कडव,उपसरपंच निलेखा नाईक कार्यक्रमाधिकारी रविंद्र कांबळे,शिक्षक वर्ग उपस्थित होते.
पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील केले.
विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज वितरीत करण्यात आले. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प व रोप देऊन करण्यात आले. मुलांची घोडागाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

नवीन दाखल झालेल्या मूलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून कागद पालकांच्या हाती सुपुर्द करण्यात आला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment