श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे झोपडपट्टीतील मुलांना अन्नदान

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि. २८ ( विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील उरण मोरा रोड वरील भवरा येथे झोपडपट्टीतील लहान बालकांना अन्नदान करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्या हस्ते लहान मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी संस्थचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच सुफल आहाराची टिम उपस्थित होती. झोपडपट्टीतील बालकांनी, लहान मुलांनी या अन्नदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment