जासई विद्यालयात प्रवेशोत्सव समारंभ संपन्न

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई ता. उरण जि.रायगड या विद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील उपस्थित होते त्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालया मध्ये तुम्ही प्रवेश घेण्याचा चांगला निर्णय घेतला आहे .येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, शाळेच्या भौतिक विकासासाठी जे एन पी ए कडून ५० लाख रुपये सीएसआर फंड शाळेकडे जमा झालेला आहे. तसेच यापुढे सुद्धा या विद्यालयाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे काम कमिटीच्या सहकार्याने केले जाणार आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे तसेच व्हाईस चेअरमन डी.आर. ठाकूर हे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या म्हात्रे के.जी. यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना गुलाबपुष,गोड चॉकलेट आणि पाठ्यपुस्तके देण्यात आले. सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारावर या येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत,ढोल ताशाच्या गजरात,लेझीम पथकाने स्वागत केले. या प्रवेशोत्सवाच्या दिनी दुपारी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात गोड जेवण दिले गेले.

या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य नूरा शेख, गणेश पाटील, मधुकर पाटील, अमृत ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, यशवंत घरत, प्रकाश म्हात्रे,आदित्य घरत, रघुनाथ ठाकूर, जी. सी. घरत, आणि पालक वर्ग तसेच उपमुख्याध्यापक श्री. कुटे, पर्यवेक्षिका मुकादम मॅडम,आणि सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घरत पी.जे.व आभार प्रदर्शन ठाकरे एस.पी. यांनी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment