चिपळूणमध्ये शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा गौरव

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : शहर शिवसेना आयोजित गुणवंत विद्यार्थी व शहरातील मान्यवरांचा सत्कार समारंभ अतिथी हॉल, चिपळूण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय संबंध यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

गुणगौरव समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या मेहनती पालकांचं व शिक्षकांचंही पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं.
विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीतून पालकांना आणि शिक्षकांना दिलेली ही यशाची भेट म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव आहे, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

रत्नागिरी जिल्हा हा केवळ भौगोलिक सौंदर्याचाच नव्हे, तर सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक दृष्ट्या संस्कृती जपणारी आहे. या जिल्ह्याने आजवर अनेक प्रतिभावान विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि समाजाला दिले आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

उदय सामंत, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक क्षमतेबरोबरच त्यांच्या छुप्या कलागुणांनाही वाव दिला पाहिजे.
विद्यार्थ्यांनीही आपल्या कर्तृत्वाने केवळ पालकांचं नव्हे तर गाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव उज्वल करावं असं मत पालकमंत्र्यांनी  केलं.

या प्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, श्रीमती रश्मी गोखले, श्री. उमेश सकपाळ, श्री. विनोद झगडे, श्री. बाबु म्हाप, प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे, मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले, श्रीमती प्राजक्ता टकले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment