‘हस्ती रहो, खेलती रहो!’

Team RatnagiriLive
1 Min Read
  • रत्नागिरीत सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन चे अनावरण

रत्नागिरी : रत्नागिरी येथील के.सी. जैन नगरमध्ये “हस्ती रहो, खेलती रहो!” या टॅगलाईनसह सॅनिटरी पॅड वेंडींग मशीनचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

फित कापून आणि मशीनचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्सविषयी माहिती घेण्यात आली. ही पॅड्स पूर्णतः सॅनिटाइज्ड असून, विशेषतः शाळकरी विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी या विषयावर जनजागृती करण्यासंदर्भात संवाद साधला.

या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख श्री. बाबू म्हाप, श्री. हर्षद भाटकर आणि इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment