हातखंबा येथे वाहनाची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी  : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे एका अज्ञात वाहनाची धडक बसून पाली येथील गराडे वाडीमधील मंगेश मधुकर भस्मे (44) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी दहा वाजता सुमारास हा अपघात घडला.

यातील दुचाकीस्वार तरुण मंगेश भस्मे हा त्याच्या दुचाकीला (MH 08-AL-0670) महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात मंगेश भस्मे यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment