६२व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सावर्डेच्या सह्याद्री कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुरस्कार!

Team RatnagiriLive
2 Min Read

संगमेश्वर : कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे ही खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते. सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या राज्य कलाप्रदर्शनात भाग घेतला असून विद्यार्थ्यांना पारितोषिके देखील प्राप्त झाली आहेत.

राहुल जाधव गुणवत्ता प्रमाणपत्र
तुषार पांचाळ कलाकृती द्वितीय पारितोषिक
प्रथमेश लिंगायत गुणवत्ता प्रमाणपत्र

यावर्षी घेण्यात आलेल्या ६२व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कला महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. या निवडलेल्या कलाकृतीनमधून शिल्पकला विभागातून कु तुषार पांचाळ याला द्वितीय पारितोषिक तसेच कु. राहुल जाधव, कु. प्रथमेश लिंगायत यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.

या वर्षीचे ६२वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे. निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे मूलभत अभ्यासक्रम – कु.सार्थक आदवडे , कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष -कु. सुयश शिगवण , रेखा व रंगकाला विभाग – कु. ऋतिका शिरकर , शिल्प व प्रतिमानबंध कला – कु. प्रथमेश गोंधळी, कु. अध्वज चव्हाण, कु. प्रथमेश लिंगायत, कु. विशाल मसणे, कु. प्रितेश गोणबरे, कु. तुषार पांचाळ, कु. शुभम पांचाळ, कु. राहुल जाधव, कु. रोशन घडशी या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment