भात लावणी स्पर्धा | कोकणातल्या मातीनं जपलेली  चैतन्यमय परंपरा!

Team RatnagiriLive
2 Min Read

संगमेश्वर : पावसाळी हंगामात विशेषतः कोकणात पाहायला मिळणारी भात लावणी तसेच नांगरणी स्पर्धा ही अलीकडच्या काही वर्षातील नव्या पिढीमध्ये चैतन्य निर्माण करणारे ठरत आहे.

संगमेश्वर :  बैलगाडी स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित पालकमंत्री डॉ.  उदय सामंत यांना गौरवताना आयोजक.

शनिवारी संगमेश्वर येथे बळीराजा वाढावेसराड पावस्कर वाडी व शिवसेना तालुका संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मातीतल्या श्रमप्रतिष्ठेला आणि पारंपरिक पद्धतींना सलाम केला.

या अनोख्या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अशी स्पर्धा असली की मी शाळा चुकवायचो, पण ही स्पर्धा नाही चुकवायचो! आज तिथेच उभं राहून ते दिवस पुन्हा अनुभवले.

डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.

संयम, चिकाटी आणि जिद्द यांच्या कसोटीवर उतरलेले स्पर्धक हेच आपल्या ग्रामीण भागाचे खरे हिरो आहेत. कोकणातील पारंपरिक शेती पद्धतींचा सन्मान जपत, या स्पर्धेमुळे एक सामाजिक एकात्मता आणि कृषी प्रेरणा देखील रूजते, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

संगमेश्वर तालुक्यातील बैलगाडी स्पर्धेच्याया मंचावरून बोलताना पालकमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत!
हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आता जगभरात शिवरायांचा इतिहास अभ्यासला जाईल आणि त्यांच्या गडकिल्ल्यांना जागतिक गौरव प्राप्त होईल.
याच पार्श्वभूमीवर, आपल्या संगमेश्वर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या स्मारकाच्या बांधकामास अधिकृत सुरुवात होणार आहे, अशी माहिती यावेळी  पालकमंत्र्यांनी दिली

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment