बालनाट्य अभिवचनाने रत्नागिरीत उद्या साजरा होणार मराठी बालनाट्य दिवस

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता दामले विद्यालय, रत्नागिरी येथे नटराज पूजन आणि बालनाट्य अभिवाचन असा कार्यक्रम आयोजित केला आहे.

रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो.

तरी सर्व नाट्यकर्मी आणि रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मराठी बालनाट्य दिवस साजरा करावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी तर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment