मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणसाठी रवाना!

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासीयांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार असून यातील एक एक्सप्रेस आज दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व कोकणवासीय नागरिक उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेसमधून गावी निघालेल्या सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment