कोकणातून जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या मुंबईत या स्थानकापर्यंतच धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारामुळे मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. या महत्त्वाच्या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वे गाड्यांच्या सेवांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यामुळे ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत काही लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई CSMT ऐवजी ठाणे आणि दादर स्थानकांवर शॉर्ट-टर्मिनेट (Short-Terminate) होणार आहेत.

या गाड्यांवर परिणाम:

  • १) १२१३४ मंगळूरु जंक्शन – मुंबई CSMT एक्सप्रेस: ही गाडी ३१/०८/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावरच थांबेल.
  • २) २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई CSMT तेजस एक्सप्रेस: ही गाडी ३१/०८/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर थांबेल.
  • ३) १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस: ही गाडी ३१/०८/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर थांबेल.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होईल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment