अविष्कार संशोधनात हन्नत शेख हिला राज्यस्तरीय सुवर्णपदक

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी हन्नात युसुफ शेख हीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा 2023 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले व Ph.D. विद्यार्थी या विभागातून महाराष्ट्र राज्य स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले.

हन्नत हिने “A Study of Islamic Marriages: Unveiling the Facts to Wipe Off Myths” या विषयावर संशोधन करून पोस्टर आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा सादरीकरण केले. तिच्या यशाबद्दल मुबंई विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, संस्थेचे उपाध्यक्ष शिषीरदादा धारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे, उरण महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बळीराम एन.गायकवाड, प्रा. के. ए. शामा, प्रा. व्ही. एस.इंदुलकर, IQAC समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण आणि इतर सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात आले व ढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment