सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शीतल आचरेकर यांचा सन्मान

Team RatnagiriLive
1 Min Read

राजापूर : जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी यांच्या तर्फे माजी विद्यार्थिनी शीतल विरेंद्र आचरेकर यांचा सन्मान करण्यात आला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शितल आचरेकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment