‘उबाठा’ शिवसैनिकांचा उद्या दादर येथे शनिवारी निर्धार मेळावा

Team RatnagiriLive
1 Min Read

दापोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा शनिवार दि. ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन दादर, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे उपस्थित राहाणार आहेत. तसेच विशेष निमंत्रित म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोलीचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर मंडणगडचे, तालुकाप्रमुख संतोष भोले, खेडचे तालुकाप्रमुख संदीप कांबळे, खेड गुहागरचे संपर्क संघटक सौ. ज्योती भोसले, दापोलीचे संपर्क संघटक सौ. स्नेहल महाडिक आदी उपस्थित राहाणार आहेत.

या निर्धार मेळाव्याचे आयोजन दापोली विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पाटील यांनी केल्यास या मेळाव्याला मुंबई स्थित दापोली मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन सुहास कोकरे रविंद्र धाडवे महेश गणवे सचिन शिर्के, प्रवीण लाड, विजय ठोंबरे, विनायक चोरगे, शंकर डांगे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment