गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बुडाले; शोधकार्य सुरू

Team RatnagiriLive
3 Min Read
  • पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

गणपतीपुळे : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथून एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली. त्यामध्ये शनिवारी 20 जून रोजी सकाळी १० च्या सुमारास गणपतीपुळे येथील समुद्रात तब्बल ५ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या बेपत्ता असून पोलीस प्रशासन, जीवरक्षक स्थानिक ग्रामस्थ आणि स्थनिक व्यावसयिकांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
संभाजीनगर येथील १९ जणांचा ग्रुप
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 20 जून रोजी सकाळी सर्वजण समुद्राचा आनंद घेण्यासाठी गेले असता, अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण बुडू लागले.
स्थानिकांचे आणि जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न
पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि कर्तव्यावर असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने धाव घेत त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, सध्या समुद्रात पाण्याचा करंट (प्रवाह) अत्यंत वेगवान असल्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
समुद्रात बेपत्ता असलेल्या ५ पर्यटकांची नावे
समुद्रात वाहून गेलेल्या आणि सध्या बेपत्ता असलेल्या ५ तरुणांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) आदित्य संतोष राऊत (वय २२)
२) अनिकेत बंडू हिवराळे (वय २०)
३) आनंद राजू नरवडे (वय २०)
४) प्रेम दीपक आदमाने (वय १९)
५) यश रामेश्वर कांबळे (वय १९)
(सर्व राहणार: बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांचे सह उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी आदींनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलाठ आहे. या घटनेची माहिती मिळतात रत्नागिरी देत असेल तर राजाराम म्हात्रे यांनी भेट देऊन संबंधित घटनेची माहिती घेऊन पर्यटकांना खोल पाण्यात न पाठविण्यासाठी संबंधित यंत्रणेंना सुचित केले.

दरम्यान शनिवारी गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाच जणांना वाचविण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आशिष माने उमेश म्हादये तसेच होमगार्ड संदेश धावडे, अंकुश घाणेकर आदींसमवेत स्थानिक व्यावसायिक केतन धनावडे, रोहित चव्हाण, मुबारक सुतार आदींनी शर्थीचे प्रयत्न केले त्यांचे विशेष कौतुक होत आहे त्याचबरोबर इतर सर्व स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी पाचही जणांना वाचिवण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाचही जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणनेकडून युद्धपातळीवर शोध सुरू असून कस्टम आणि मच्छीमार बोट आदींच्या साह्याने पोलीस यंत्रणे कडून विशेष शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये प्रेम आदमाने आईवडिलांचा एकुलता एक आहे तसेच यश कांबळे याचे वडील हयात नाहीत. मात्र तो एकुलता एक आहे त्याचबरोबर आनंद नरवडे हा देखील आई-वडिलांचा एकुलता एक आहे त्याचबरोबर आदित्य राऊत आणि अनिकेत हिरवाळे यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. या घटनेने संपूर्ण गणपतीपुळे परिसरात मोती हळहळ व्यक्त होत आहे.

या मोठ्या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन समुद्र स्नानासाठी उतरू नये तसेच दुरूनच समुद्राचा आनंद घेऊन पर्यटनाचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment