संगमेश्वर तालुक्यातील ५ विद्यार्थ्यांना ‘चतुरंग’चा गोडबोले पुरस्कार

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरूख : चतुरंग प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार 2023-24 साठी संगमेश्वर तालुक्यातील 5 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

ग्रुप इंटरव्हिव्हसाठी रत्नागिरी जिल्हातून 53 शाळांमधील 207 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. तालुक्यातील माखजन हायस्कूलमधील कोमल मांगीराम पटेल. देवरूख न्यू इंग्लिश शाळेतील सावनी संभाजी आंब्रे. गांधी हायस्कूल कोंडगावचा ऋवेद केदार रेमणे, मिनाताई ठाकरे हायस्कूलचा पार्थ केतन ब्रीद. अरूधती पाध्ये स्कूलमधील कुमारी गुंजन आषिश खवळे यांची या वर्षीच्या सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

चतुरंग पुरस्कारासाठी पात्रठरलेले सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक,पालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment