महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी ‘वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा’; मंत्रालयात महत्त्वाच्या संकल्पनेचे सादरीकरण

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार, सागरी कामगार आणि किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सूचना मरीन प्रा. लि.’ (Soochana Marine Pvt. Ltd.) या कंपनीकडून ‘Water Ambulance Service for the Maharashtra Coast’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण आज मंत्रालयात करण्यात आले.

​समुद्रात किंवा दुर्गम किनारी भागात अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ आणि उच्च दर्जाची वैद्यकीय मदत पोहोचवणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे किनारपट्टीवरील आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

​या सादरीकरण प्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाचे (MMB) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • मुख्य वैशिष्ट्ये:
    • ​मच्छीमार आणि सागरी कामगारांना समुद्रात तातडीची वैद्यकीय मदत.
    • ​दुर्गम किनारी भागात जलदगतीने आपत्कालीन आरोग्य सेवा.
    • ​आपत्ती व्यवस्थापनाला मिळणारे नवे बळ.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment