कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल २ व ३ सप्टेंबरला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

Team RatnagiriLive
1 Min Read
  • ‘एसआयआर’ आणि लोकप्रतिनिधींची बैठक

रत्नागिरी, दि. ३१ : कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल (भा.प्र.से.) बुधवार, दिनांक २ आणि गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या जिल्ह्यातील ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ (SIR), महसूल विषयक कामकाज, मतदान केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

२ सप्टेंबर दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवारी विभागीय आयुक्त चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल होतील. तदनंतर त्या मतदान केंद्र व नगर परिषद/ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देतील.
दुपारी त्या चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघातील शाळेतील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत एसआयआर (SIR) व महसूल विषयांबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात त्या राजापूर नगरपरिषद व स्थानिक मतदान केंद्रांची पाहणी करतील व त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी त्या कणकवलीकडे (सिंधुदुर्ग) रवाना होतील.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment