उरण : उरण तालुक्यातील द्रोणागिरी मातेच्या मंदिराच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन रविवारी सकाळी ११ वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी सभापती ऍड.सागर कडू यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन फंडातून दहा लाखाचं निधी या कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी बुरुंडे यांनीही सढळहस्ते मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा, वंदना कोळी,नागाव ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र ठाकूर, मंदिर कमिटी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भूमिपुजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

