‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांचे मोर्डे (देवरुख) येथे रविवारी संमेलन

Team RatnagiriLive
2 Min Read
  • ‘झेप क्षितिजापलिकडे’तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

मोर्डे (देवरुख) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकणातील (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन येत्या रविवारी (दि. १७) मौजे मोर्डे (देवरुख), संगमेश्वर येथे संपन्न होत आहे. ‘अभाविप’च्या प्रवासाचे प्रमुख शिक्षक राहिलेल्या यशवंतराव केळकर (१९२५-२०२५) यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्ताने हे संमेलन संपन्न होणार आहे.

कोकणात ‘अभाविप’चे ‘कार्यकर्ता’ म्हणून विद्यार्थी दशेत काम केलेल्या पूर्व कार्यकर्त्यांचे संघटन ‘झेप क्षितिजापलिकडे’ ही संस्था या कार्यक्रमाची आयोजक आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘अभाविप’चे महाराष्ट्र प्रदेश पूर्व प्रांत संघटनमंत्री रत्नाकर पाटील उपस्थित राहाणार आहेत.

आयुष्यातील फार मोठा काळ व्यासंगात रमणारे, सामाजिक बांधिलकीची जाण असणारे व आपण खूप कष्ट करून तावून सुलाखून जे ज्ञान मिळविले ते समाजापर्यंत पोहोचविण्याची तळमळ असणारे अभ्यासू कार्यकर्ते घडविणारी जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे पाहिले जाते. १९९५ साली अ.भा.वि.प.चे मोर्डे येथे श्रमानुभव शिबीर झाले होते. या पार्श्वभूमीवर १६ व १७ मे २०२६ रोजी मोर्डे गावी आठवणींच्या हिंदोळ्यावर अंतर्गत ‘शिबिरातील कार्यकर्ता पर्व’ हा दोन दिवसीय निवासी उपक्रम संपन्न होत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून १७ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजता या वेळेत ‘पूर्व कार्यकर्ता संमेलन’ होणार आहे.

या संमेलन कार्यक्रमाला ‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्यने उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी संभाजी आंब्रे, मो. +919890744838 येथे संपर्क साधावा, असे आवाहन झेप क्षितिजापलिकडे संस्थेचे सचिव धीरज वाटेकर आणि शिबीर प्रमुख वैभव सरदेसाई यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment