होळीसाठी कोकणात जादा एसटी बसेस सोडाव्यात

Team RatnagiriLive
1 Min Read

कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण मार्फत महामंडळाला निवेदन

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : होळी सणा निमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सालाबाद प्रमाणे कोकण वासी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यासंदर्भातील निवेदन कोकण वासीय उत्कर्ष संस्था, उरण या संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी आणि कार्यकारिणी सदस्य संतोष पवार यांनी एस टी महामंडळाचे आगार प्रमुख व्ही.एन.वारघडे यांना दिले.

हे निवेदन आगार प्रमुख व्ही. एन.वारघडे यांनी संबंधित विभागातील रामनाथ म्हात्रे मोबाईल नंबर ९३२६३९५५२९ यांना ॲडव्हान्स बुकिंग करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

सालाबादप्रमाणे होळी सणानिमित्त कोकणात जाण्यासाठी जसे रत्नागिरी (रातराणी), माणगाव – महाड – पोलादपूर – खेड ), दाभोळ – दापोली, , देवरुख, कणकवली या ठिकाणी राहणाऱ्या कोकणवासीयांनी या संधीचा लाभ घ्यावा.रामनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून ऍडव्हान्स बुकिंग करून घ्यावे असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment