चिमुरड्या समायरा पारेखच्या रिल्सची अभिनेता समीर चौघुलेंकडून दखल

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे गावची ८ वर्षीय समायरा रुमान पारेख या मुलीच्या व्हिडिओची खूद्द ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनी दखल घेतली आहे.

सैतवडे गावची ८ वर्षीय समायरा पारेख ही महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौघुले यांची खूप मोठी चाहती आहे. ती समीर चौघुले यांच्या अनेक विनोदी व्हिडिओजवर रिल्स बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. असाच एक समीर चौघुले यांचा प्रसिध्द लोचन मजनू उंदीर मांजर पकडींगो या वर तिने रील्स बनवून इंस्टाग्राम वर पोस्ट केला आणि तो खुद्द समीर चौघुले यांनी पाहिला. तो व्हिडिओ बघितल्यावर समीर चौघुले यानी खूद्द त्याची दखल घेत समायराला मेसेज करून तिच्या या व्हिडिओसाठी धन्यवाद दिले.

एवढी लहान चिमुरडी त्यांच्या विनोदाची आणि कामाची चाहती असू शकते, यांचा त्याना विश्वास बसत नव्ह्ता आणि तिला मेसेज न करता त्याना राहावलेच नाही. दरम्यान, खुद्द एवढा मोठा सेलेब्रिटीचा मेसेज बघुन समायराचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि आपण अजून चांगले काम करू, असे आश्वासन ही तिने समीर चौघुलेना दिले. ते आता तिच्याशी नेहमीच मेसेज वर बोलत असतात आणि सैतवडेसारख्या लहान गावातील एका लहान मुलीची समीर चौघुले यांच्यासारख्या मोठ्या कलाकराने प्रशंसा करणे ही खरच अभिमानची बाब ठरली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment