सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

Team RatnagiriLive
2 Min Read

सैतवडे : दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे ता. जि. रत्नागिरी येथे दि. २८ मार्च रोजी मुस्लीम एज्युकेशन सोसायटीतर्फे मर्चंट नेव्ही करिअर गाइडन्स कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास मर्चंट नेव्हीमध्ये करिअर कसे करावे याचे पूर्ण गाइडन्स देण्यात आले. या साठी आपल्या दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे १९७५ चे माजी विद्यार्थी आणि कॅ. प्रकाश जोग यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कॅ. प्रकाश जोग हे सत्कोंडी गावाचे रहिवासी असून त्याना २५ वर्षाचा सागरी क्षेत्रातील अनुभव आहे.

मर्चंट नेव्ही संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॅप्टन प्रकाश जोग

यावेळी श्री. जोग यांनी मर्चंट नेव्ही इ १० वी आणि १२ वी नंतर कशी जॉईन करावी याची पूर्ण माहिती विद्यार्थी आणि पालकाना दिली तसेच विद्यार्थी आणि पालकाच्या अनेक प्रश्नाची ही त्यांनी उत्तरे देवून त्यांच्या शंकाचे निरसन केले.

या कार्याक्रामचे सूत्रसंचालन दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे चे कला शिक्षक श्री. पेढे यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी केले. तसेच मुख्य अतिथींचे स्वागत आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री रहीम माद्रे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीमती जाधव यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री रहीम हसन माद्रे , उपाध्यक्ष श्री शफी चिकटे, सचिव श्री रुमान पारेख, सदस्य श्री अकरम कापडे, न्यू इरा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. हिना खोत, कर्मचारी काजोळकर, दि मॉडेल स्कूल कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment