निरामय योगा संस्था रत्नागिरीतर्फे दर शनिवारी मोफत योग शिबीर

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : निरामय योगा संस्था, रत्नागिरी, पतंजलीचे मुख्य प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दर शनिवारी पहाटे 5.30 ते 7.30 या वेळेत शहरानजीकच्या भाटये समुद्रकिनारी झरी विनायक मंदिर येथे,निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आवाहन करण्यात आले आहे.

नाडी परीक्षण करून सर्व आजाराचे निदान करणे, रोगानुसार योग प्रशिक्षण, अग्नि, वायू, आकाश, पृथ्वी, जल या पंचतत्वाच्या सानिध्यात योग करण्याचा सुवर्णलाभ
सर्व वयोगटासाठी विशेष मार्गदर्शन अशी शिबिराची खास वैशिष्ट्ये आहेत.योग शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीकरिता 9028899412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पतंजलीचे रत्नागिरी येथील मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री. वीरू स्वामी यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment