पनवेल येथून रत्नागिरीसाठी आज रात्री सुटणार अनरिझर्व्हड ट्रेन!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : समर स्पेशल अनारक्षित गाड्यांपैकी पनवेल ते रत्नागिरी अशी धावणारी साप्ताहिक विशेष गाडी आज शुक्रवारी रात्री रत्नागिरीसाठी सुटणार आहे. कोकण रेल्वे मार्ग वरील समर स्पेशल लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशांनी या गाडीने प्रवास करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन प्रवासी संघटनांमार्फत करण्यात आले आहे.

गाडी क्र. 01134 पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 21:30 वाजता सुटून ती दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचणार आहे.

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर या स्थानकावर थांबे घेऊन रत्नागिरीला तिचा प्रवास संपणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment