दापोलीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक

Team RatnagiriLive
1 Min Read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणार भव्यदिव्य कार्यक्रम

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ( मंगळवारी) श्री शिवछत्रपती सभागृह, दापोली येथे आढावा बैठक घेतली.


यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, दापोली उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, खेड उपविभागीय अधिकारी श्रीमती राजश्री मोरे व इतर अधिकारी-कर्मचारी, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम दिनांक 25 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जिल्हास्तरावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दापोली पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी बैठक घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment