कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला जादा कोच

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी जामनगर ते तिरूनेलवेली या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला स्लीपर श्रेणीचा अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी झाल्याने ती कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेत प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा दिला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 19578 व 19577 या गाड्यांना स्लीपर दर्जाचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. जामनगर ते तिरुनेलवेली या मार्गावर धावताना या एक्सप्रेस गाडीला दि. 25 व 27 मे 2023 रोजी च्या फेरीसाठी तर तिरूनेलवेली ते जामनगर या मार्गावर धावताना दि. 29 आणि 30 मे 2023 रोजी स्लीपरचा एक जादा डबा जोडला जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment