प्राणीप्रेमी राजू मुंबईकरांनी वाचविले मोराचे प्राण!

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि. ११ (विठ्ठल ममताबादे ) : जंगलातील रस्त्यावर झाडाच्या आधाराला बसलेला आणि उडता येत नसलेल्या एका मोराला प्राणीप्रेमी राजू मुंबईकर यांनी जीवदान दिले आहे

प्राणीप्रेमी राजू मुंबईकर हे दि . 10 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत बसलेला एक शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी म्हणून परिचित असलेल्या राजू मुंबईकर यांना दिसला. राजू मुंबईकर त्या मोराच्या जवळ गेले असता तो उडत नव्हता. ही बाब लक्षात येताच मुंबईकर यांनी कर्नाळा आर एफ ओ राठोड यांना याबाबत राजू मुंबईकरांनी कल्पना दिली आणि लगेच फॉरेस्टर वारगे यांना पाठवले. यानंतर या मोराची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला आराम द्यायला सांगण्यात आले आणि त्याची रवानगी लगेच कर्णाळा पक्षी अभयअरण्यात करण्यात आली आहे. सध्या तो मोर सुखरूप आहे. मोराचे प्राण वाचविल्याने सर्व फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी केअर ऑफ नेचरच्या सर्व रेस्क्यू टीमचे आभार मानले. वेळेवर उपचार मिळाल्याने मोर वाचल्याने केअर ऑफ नेचर या सामाजिक व निसर्गप्रेमी संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आर एफ ओ राठोड यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सोबत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्रचे सचिव विलास ठाकूर .आर एफ ओ राठोड, फॉरेस्टर वारजे उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment