जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, विजय सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, तहसीलदार ज्योती वाघ,तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, स्वीय सहाय्यक संदीप सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हावासियांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. सदैव शासन आपल्या दारी आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment