भेंडखळ ग्रामपंचायतीतर्फे आठ दिव्यांगांना पिठाच्या चक्कीचे वाटप

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक 28 /8 /2023 रोजी भेंडखळ येथील आठ दिव्यांग व्यक्तींना सरपंच मंजीता मिलिंद पाटील, उपसरपंच दीपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर ,अभिजीत ठाकूर, लिलेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्या संगीता मेघश्याम भगत, स्वाती महिंद्र घरत, सोनाली कौस्तुभ ठाकूर, शीतल जीवन ठाकूर, अक्षता अनिल ठाकूर , स्वाती संतोष पाटील, प्राची गणेश पाटील, ग्रामविकास अधिकारी किरण वसंत केणी यांच्या उपस्थितीत आठ दिव्यांग व्यक्तींना पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.

लाभार्थ्यांना भेंडखळ ग्रामपंचायतीतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विविध योजना विषयी दिव्यांग्यांना माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी भेंडखळ ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असल्याने सर्व ग्रामस्थांनी, प्रतिष्ठित मान्यवरांनी भेंडखळ ग्रामपंचायतच्या विविध कार्याचे व दिव्यांग बांधवाना पिठाच्या गिरणीचे वाटप केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment