दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा प्रवास शुक्रवारपासून ‘ठंडा ठंडा कूल कूल’ !

Team RatnagiriLive
1 Min Read
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सामान्यांना परवडतील, असे इकॉनोमि श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. ही गाडी पूर्वीप्रमाणेच १६ डब्यांची धावणार आहे. गाडीच्या डब्यांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. उलट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने गारेगार प्रवासाची प्रवासी जनतेला भेट दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडण्याची मागणी प्रवासी जनतेकडून केली जात होती. कोकण विकास समितीने यासाठी कोकण रेल्वेकडे पाठपरवा देखील केला होता. रेल्वेने याची दखल घेत इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे दिनांक 15 सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार मडगाव -सावंतवाडी (50108), त्याच रेकसह पुढे सावंतवाडी ते दिवा (10106) मार्गावर रोज चालवली जाणारी एक्सप्रेस गाडीला दिनांक 15 सप्टेंबर पासून दिनांक 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. यामुळे मागील अनेक वर्षांपासून पॅसेंजर तर सध्या एक्सप्रेस म्हणून चालवली जाणाऱ्या या गाडीतून पहिल्यांदाच ‘ठंडा ठंडा कूल कूल’ असा प्रवास अनुभवता येणार आहे. परतीच्या प्रवासात दिवा सावंतवाडी (10105), सावंतवाडी ते मडगाव (50107) ही गाडी दिनांक 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वातानुकूलित थ्री टायर दोन डब्यांचा धावणार आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment